19.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र जिंकण्यास गुजराती आमदार, कार्यकर्ते सक्रिय

महाराष्ट्र जिंकण्यास गुजराती आमदार, कार्यकर्ते सक्रिय

नाशिक : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही काळात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपनेही यासाठी जोर लावला असून लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे.

त्याचमुळे आता महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत घेतली जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती तयार केली असून त्यांच्या आदेशाने भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते सक्रीय झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी गुजरात भाजपची स्पेशल टीम सक्रीय झाली आहे. यासाठी गुजरातमधील भाजपच्या आजी-माजी आमदारांसह पदाधिका-यांची ही स्पेशल टीम नाशिकमध्ये दाखल झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासातील गुजरातचे आमदार आणि कार्यकर्ते यासाठी सक्रीय झाले आहेत. या स्पेशल टीमची उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांबाबत नाशिकमध्ये बैठक पार पडली.

या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील ४८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी संविधान बदलाचा जो प्रचार केला त्याला कसं खोडून काढायचं याची रणनीती या टीमकडून बनवली जात आहे. यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांना गुजरातच्या स्पेशल टीमकडून मार्गदर्शन करण्यात आलं, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR