23.3 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरमहाविकास आघाडीची मंगळवारी पदयात्रा, प्रचार शुभारंभ सभा

महाविकास आघाडीची मंगळवारी पदयात्रा, प्रचार शुभारंभ सभा

 

पदयात्रेत सहभागी व्हा, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे लातूरकरांना आवाहन

पदयात्रा काढून भरणार उमेदवारी अर्ज
लातूर : प्रतिनिधी
लातूर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धिरज विलासराव देशमुख हे मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी शहरातून भव्य मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दुपारी १ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभाची सभा होणार आहे. या निवडणूक प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने तुमची साथ हवी आहे, लातूरच्या प्रगतीसाठी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मतदारांना केले आहे.

राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व समाजातील नागरिकांच्या भेटीगाटी घेतल्या आहेत. महाविकास आघाडीतील पदाधिका-यांंशी चर्चा करुन एकजुटीने प्रचार यंत्रणा राबवण्याबाबत चर्चा केली आहे. सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी सकाळी सर्व ग्रामदेवतांचे दर्शन आणि महापुरुषांना अभिवादन करुन आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धिरज विलासराव देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करतील, लातूरचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गंजगोलाई येथे आई जगदंबेचे दर्शन करुन आरती करुन मिरवणुकीला सुरुवात होईल.

सदरील पदयात्रा गंजगोलाई येथून हनुमान चौक, कॉंग्रेस भवन, गांधी चौक, महात्मा फुले पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहोचेल. मिरवणूक महामार्गावरील सर्व महापुरुषांना अभिवादन करुन त्यानंतर दुपारी १ वाजता महाविकास आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ सभा होईल. या प्रचार शुभारंभ सभेस व पदयात्रेस मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेनेचे सुनील बसपूरे, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, कम्युनिस्ट पार्टीचे संजय मोरे, आम आदमी पार्टीचे प्रदीप भोसले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR