लातूर : प्रतिनिधी
खास दिवाळीच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूरच्या वतीने दोन दिवसीय ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’ चे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दि. १४ रोजी झाला. या बाजारात महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. परंतु, हे सर्व करीत असताना संयोजकांनी ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’मधील प्रत्येक कक्षाला देशातील संत व कर्तृत्ववान महिलांची नावं देऊन त्यांचाही सन्मान केला. संयोजकांनी ही संकल्पना ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’ला भेट देणा-या सर्वांनाच भावली.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन अॅग्री लि.च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लातूर शहरातील व जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उद्योजिकांना मोठी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या बाजारात महिलांनी तयार केलेल्या गृह उपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, हस्तकला, मसाले, तयार कपडे आणि विविध प्रकारचे दिवाळी साहित्य यांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे.
‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’मधील कक्षांना देण्यात आलेली नावं अशी… संत जनाबाई कक्ष, कमला चौधरी कक्ष, संत मिराबाई कक्ष, अरुणा असफअली, झलकारीबाई कक्ष,्र मीताली राज कक्ष, सिंधुताई सपकाळ कक्ष, मेरी कोम कक्ष, राणी चेन्नम्मा कक्ष, प्रतिभाताई पाटील कक्ष, संत मुक्ताबाई कक्ष, बहिणाबाई कक्ष, मालतीबाई कक्ष, भगिनी निवेदीता, फ्लॉरेन्स नाईटिंगेल कक्ष, राजमाता जिजाऊ कक्ष, पंडिता रमाबाई कक्ष, डॉ. ताराबाई मोडक कक्ष, इंदीरा गांधी कक्ष, प्रीतिलता वड्डेदार कक्ष, कमलादेवी चट्टोपाध्याय कक्ष, अरुणा रॉय कक्ष, उषा मेहता कक्ष, इरावती कर्वे कक्ष, रमाई आंबेडकर कक्ष, ताराबाई शिंदे कक्ष, मुक्ता साळवे कक्ष, पी. टी. उषा कक्ष, लता मंगेशकर कक्ष, महाश्वेतादेवी कक्ष, सुनीता विल्यम्स कक्ष, कल्पना चावला कक्ष, डॉ. कमला सोहोनी कक्ष, आनंदीबाई जोशी कक्ष, डॉ. रखमाबाई कक्ष, मदर तेरेसा कक्ष, साधना आमटे कक्ष,्र रमाबाई रानडे कक्ष, मारिया माँटेसरी कक्ष, विजयालक्ष्मी पंडित कक्ष, दुर्गाबाई देशमुख कक्ष, कल्पना दत्ता कक्ष, सूचेता कृपलानी कक्ष, फातिमा शेख कक्ष, कमला नेहरु कक्ष, कस्तूरबा गांधी कक्ष, भिकाईजी कामा कक्ष,्र राणी लक्ष्मीबाई कक्ष, पु. अहिल्यादेवी कक्ष, महाराणी ताराबाई कक्ष, मंदाकिनी आपटे कक्ष, किरण बेदी कक्ष, संत कान्होपात्रा कक्ष, सरोजिनी नायडू कक्ष, महाराणी येसुबाई कक्ष, सावित्री सृजन कक्ष, दुर्गाबाई भागवत कक्ष, सुधा मुर्ती कक्ष, संत मिराबाई कक्ष, अशी नावे देण्यात आली आहेत.

