नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची घटना घडली. कीटकनाशक प्राशन करून कबड्डीपटूने आयुष्य संपवले. सावनेरमध्ये ही घटना घडली असून आर्थिक अडचणी, नोकरीचे आमिष आणि लग्नात झालेली फसवणूक या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सावनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण सूरज दाढे असे आत्महत्या केलेल्या महिला कबड्डीपटूचे नाव होते. स्वप्निल जयदेव लांबघरे असे आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचे नाव असून तो सध्या फरार आहे. नोकरी लावून देण्याच्या आश्वासनावर २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने स्वप्निलने किरणसोबत लग्न केले होते. पण तरीही किरण ही माहेरी रहात असल्याचे बोलले जात होते.

