महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला अटक

पुणे : प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजता बनकरला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती समोर आली आणि संपूर्ण साता-यात खळबळ उडाली.

धक्कादायक बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अशी दोन नावे समोर आली. या घटनेची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. याच प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २५ ऑक्टोबर) पहाटे ४ वाजता बनकरला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन आरोपींची नावे समोर आली. यातील एक आरोपी पीएसआय गोपाळ बदने आहे, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. त्यामुळे या दोघांचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

अशातच पोलिसांनी एका आरोपीला म्हणजेच प्रशांत बनकरला अटक केली आहे. प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला आहे. तिने तिच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये याबाबत लिहिण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बनकरचा शोघ घेण्यात येत होता. अशातच प्रशांत बनकरला आज पहाटे चार वाजता पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तो मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता, सातारा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर ती वा-याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरली. त्यानंतर या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने स्वत:च्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news