21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeसोलापूरमहिला -मुलींचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी जि. प.च्या शिक्षण विभागाने तयार केले जनजागृती स्टिकर

महिला -मुलींचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी जि. प.च्या शिक्षण विभागाने तयार केले जनजागृती स्टिकर

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यालयासह सर्व शाळांमध्ये लैंगिक शोषण अत्याचाराबाबत जाणीव करून देण्यासह त्यासंदर्भात जनजागृतीसाठी माहिती फलक व टोल फ्री क्रमांकचे स्टिकर सर्वत्र लावण्यात येत आहेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा सहकार्यालयात मध्ये हे स्टिकर लावण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

अंगणवाडीसह, प्राथमिक माध्यमिक शाळांसह, विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह, महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार, लैंगिक शोषण थांबविण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत सर्वत्र सर्वत्र जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिनापासून याची सुरुवात झाली आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जनजागृतीचे जनजागृती फलक, हेल्पलाईन स्टीकर लावण्यात येत आहेत.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी बदलापूर (मुंबई) येथे एका शालेय विद्यार्थीनीवर अत्याचाराची दुर्घटना घडली. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थीनी, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. त्यानंतर शासनाने विविध उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. पण, अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये मध्य अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान महिला हिंसाचार निर्मूलन दिन पासून शाळा, विविध महाविद्यालयांमध्ये लैंगिक शोषण रोखण्यासाठी जनजागृती पंधरावडा राबवण्यात येतोय.

घरगुती हिंसाचार कायदा, पोक्सो कायदा, भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक हिंसाचार या कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचबरोबर लैंगिक समानता, संम ती, चांगला वाईट स्पर्श, सुदृढ नातेसंबंध, महिलांच्या सन्मानाची जपणूक आणि आदर याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्याची सूचना ही यू.जी.सी. ने विद्यापीठांना केली आहे.
देशभरातील सर्व विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी, विद्यार्थीनींना या अभियानात महिला आणि विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण रोखणे, त्यांना लैंगिक अत्याचारांबाबत जाणीव करून देणे, तसेच तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभियानात महिलांसाठी आपत्कालीन क्रमांक (११२) महिलांसाठींची (१८१) आणि लहान मुलींसाठी (१०९८) हेल्पलाइन याबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

१० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन पर्यंत हे अभियान देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबवले जाणार आहे. या अभियानात महिला आणि विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण रोखणे, त्यांना लैंगिक अत्याचारांबाबत जाणीव करून देणे, तसेच तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, एखादी घटना घडल्यानंतर ती नोंदविणे, तक्रारपेटीतील तक्रारींच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR