23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरमहिला सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकेने केली भरीव तरतूद 

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकेने केली भरीव तरतूद 

लातूर : प्रतिनिधी
महिलांना सक्षमीकरण करायचे असेल तर त्यांच्या आर्थिक उन्नतीचा स्तर उंचावण्यासाठी भरीव निधिची तरतूत करणे गरजेचे आहे. तीच सुमारे दहा कोटी रुपयांचे तरतूद लातूर  ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून केली. त्याचा प्रत्यक्ष लाभ महिलांना मिळत आहे. भविष्यातही महिला सक्षमीकरणात भरीव योगदान देण्याकरता आमदार धिरज देशमुख यांना आशिर्वाद द्यावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा, नागझरी येथे दि. १६ संप्टेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनिता अरळीकर, विकास  कारखान्याचे माजी संचालक गोविंदराव बोराडे, अनंत बारबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, मागील ४० वर्षापासून तूम्ही सर्वानी विलासराव देशमुख साहेबांचे काम पाहिले आहे.   त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख लातूर जिल्ह्यासह ग्रामीणचा सर्वांगिण विकास करीत आहेत. गोर-गरीब, शेतकरी, कष्टकरी नागरीकांच्या अडी-अडची सोडवण्यासाठी तत्पर आहोत. भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक खोटी आश्वासने आपल्याला दिले आहेत. मतदारांची दिशाभूल करीत सत्ता मिळवणे, हाच एकमेव त्यांचा उद्देश आहे. येणा-या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपा आणि सत्ताधारी दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यांच्या खोट्या, फसव्या आणि दिशाभूल करणा-या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन केले.
याप्रसंगी नागझरी येथील महिला तेजा पवार, शोभा पवार, वैशाली साळूंके, नाजीमा शेख, ज्योती रणदिवे, सुरेखा हारगावकर, संगिता सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पवार, नरेश पवार, सुदाम साळुंके, काशीनाथ स्वामी, बजरंग बनसोडे, गफार पटेल, नरेश पवार, दत्ता पवार, रामदास घोडके, अनिल दरकसे, हणमंत ढमाले, श्रीराम साळूंके आदी महिलासह पुरुष मंडळी उपस्थित होती. तर भोईसमुद्रगा येथील लक्ष्मीताई रोंगे, मंगल वाघमारे, गुंडाबाई पांचाळ, राहूल रोंगे, नानासाहेब रोंगे,  कल्याण देशमुख, विकास देशमुख, दत्ता चोथवे, लक्ष्मण वाघमार आदी महिलासह पुरुषही उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा एकदा संधी द्या, विश्वासाने विकास करून घ्या
रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धिरज देशमुख लातूर ग्रामीण मधील नागझरी व भोईसमुद्रगा येथील महिलांशी संवाद साधताना म्हणाल्या, आमदार धिरज देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत प्रामाणिकपणे मतदारसंघाचा विकास केला. मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा आमदार धिरज देशमुख यांना संधी देऊन विश्वासाने विकास कामे करुन घ्यावीत, असे आवाहन केले. तसेच आपल्या सर्वांशी देशमुख परीवाराचे नाते आपुलकीचे प्रेमाचे असून ते नाते अधिक घट्ट करण्यासाठी आम्ही महिलांसमवेत सुसंवाद साधत आहोत. महिला माता-भगिनींचे आशिर्वाद व प्रेम मोठ्या प्रमाणात मिळत असून याचा आपणास मनापासून आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR