चाकूर : प्रतिनिधी
माझ्यात जिद्द, चिकाटी, प्रमाणीकपणा असुन मी प्रत्येक काम मन लावून करते, मग ते काम घरातील मुलाकडे लक्ष देणे, पतीची काळजी घेणे असो किंवा इतर कोणतेही काम मग ते धुणी-भांडी करणे किंवा स्वयंपाक करणे असो, यामुळे मला कामात आनंद मिळतो. तसेच यश ही मिळते. मी नेहमी सकारात्मक विचार करते, त्यामुळे सकारात्मक उर्जा मिळत राहाते. मी शिकलेली असल्याने काय चांगले आणि काय वाईट हे मी पारखते असे ठाम पणे सांगणा-या नायगावच्या सरपंच वैष्णवी सावंत यांनी आपल्या कर्तुत्वातून महिला अबला नसून सबला आहेत हे दाखवून दिले आहे.
तालूक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या त्या लोकनियुक्त सरपंच असुन सरपंच पदाचा पदभार – सन २०२२- २०२३ मध्ये घेतला. महिला सरपंचानी पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गावाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यांचे काम केले आहे. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातुन महिलाचे संघटन करून आणि महिलांचे आर्थिक बळकटी करणे तसेच महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण, जागरूकता, साक्षरता, समाजात समान दर्जा, चांगले जीवनमान आणि प्रशिक्षण याद्वारे महिलांचा दर्जा वाढवणे यासाठी सरपंच सौ. वैष्णवी सावंत यांनी अहोरात्र प्रयत्न केले. सरकारी योजना काय आहेत हे जनजागृती द्वारे सांगणे, तसेच महिलांचे दृष्टिकोन स्वीकारणे, त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणे आणि शिक्षण, साक्षरता, समाजात समान दर्जा, चांगले जीवनमान आणि प्रशिक्षणाद्वारे महिलांचा दर्जा वाढवणे यासाठी प्रयत्न केले आहेत.

