लातूर : प्रतिनिधी
राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवनवीन तंत्रज्ञान वापरत मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३० टनी नवीन बॉयलरचा अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला.
यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, कारखान्याचे संचालक शंकर बोळंगे, संचालक श्रीकृष्ण काळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी कारखान्याचे चीफ अकाउंटंट श्री व सौ शरद साळुंखे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. मांजरा कारखान्याने गाळप क्षमतेत वाढ केली असून कारखान्याच्या आसवणी प्रकल्पामध्येही वाढ केली आहे. त्यासाठी नवीन ३० टनी बॉयलरची उभारणी करण्यात आली असून यामुळे शेतक-यांचा गाळप लवकर होण्यास मदत होणार आहे.

