लातूर : प्रतिनिधी
सी.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू-हॉलंड), विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना, न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स धाराशिव आणि मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड यंत्र चालक प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला.
यावेळीं रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिन डिग्रसे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यलक्षी संचालक अण्णासाहेब पाटील, विषय विशेषज्ञ डॉ. सचिन शिंदे, ऊस विकास अधिकारी सिद्धेश्वर जाधव, सी.एन.एच. न्यू हॉलंडचे अमोल बामनोटे, वाहन समन्वयक नितीन साळुंके, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे अॅग्रीओव्हरसियर शिवाजी सांडूर, तसेच विलास सहकारी साखर कारखान्याचे अॅग्रीओव्हरसियर जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षकांनी या प्रशिक्षण शिबिरात ऊसतोड यंत्रांचे तांत्रिक ज्ञान, देखभाल, सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धती तसेच शेतक-यांशी संवादकौशल्य यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. सचिन डिग्रसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन शिंदे यांनी केले.

