16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeलातूरमांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला; ०.२५ मिटरने ६ वक्र दरवाजे उघडले

मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला; ०.२५ मिटरने ६ वक्र दरवाजे उघडले

लातूर : प्रतिनिधी
मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मांजरा प्रकल्पाचे सहा वक्र दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत.

मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. १८/०८/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता गेट क्रमांक २ व ५ ( हे २ गेट) ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पाच्या सांडव्याची ६ वक्रद्वारे (क्र.१,२,३,४,५ व ६) ०.२५ मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रात ५२४१.४२ क्युसेक्स (१४८.४४ क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.

मांजरा प्रकल्पामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणा-या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR