लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी मांजरा साखर कारखान्याच्या वतीने कारखाना साईटवर असलेल्या स्मृती स्थळी कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्यासह मांजरा परिवारातील संस्थांचे चेअरमन पदाधिकारी संचालक मंडळ यांच्याकडून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विकासरत्न विलासराव देशमुख यांचा स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विकासरत्न विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अँड. प्रविण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपत बाजुळगे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव मोरे, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, कारखान्याचे संचालक तथा माजी उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शेती कमिटी अध्यक्ष कैलास पाटील, संचालक तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, सदाशिव कदम, अनिल दरकसे, नवनाथ काळे, धनराज दाताळ, मदन भिसे, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे , दयानंद बिडवे, बालासाहेब पांढरे, भैरु कदम, श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण, तक्रार निवारण समिती अध्यक्ष तानाजी जाधव, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सूळ, मीडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी यांच्या सह विविध संस्थांचे संचालक मान्यवर उपस्थित
होते.
















