23.5 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeलातूरमांजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ  

मांजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ  

लातूर : प्रतिनिधी
राज्यात नावलौकिक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या  ३८ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक मंडळ, खाते प्रमुख व कर्मचा-यांच्या उपस्थितीत ७ नोव्हेंबर पार पडला.
तत्पूर्वी कारखान्याचे संचालक नवनाथ दादाराव काळे यांच्या हस्ते सप्त्नीक पूजा करण्यात आली.  कारखान्याच्या येणा-या गाळप हंगाम २०२४-२५ साठीची सर्व कामे झाली असून कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.  यावेळी मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, सदाशिव  कदम, वसंत उफाडे, निळकंठ बचाटे-पवार, महेंद्रनाथ भादेकर, शेरखान पठाण, सूर्यकांत पाटील, अनिल दरकसे, कैलास पाटील, ज्ञानेश्वर भिसे, सचिन शिंदे,  धनराज दाताळ, बंकट कदम, विलास चामले, कार्यकारी संचालक  पंडित देसाई, श्रीनिवास देशमुख, खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित  होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR