माकणीतील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

औसा : प्रतिनिधी
सततधार पावसाने भरलेल्या लोहारा, औसा तालुक्यातील सीमावरील माकणी, मातोळा गावालगतचा निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्याचा जलपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रकल्पाच्या कामकाजाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली. धाराशिव लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ऑगस्ट महिन्यातच हा प्रकल्प भरला असून या जलसाठ्यात वाढ झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टीने शेतक-यांसाठी दिलासा मिळाला आहे.

दि. २ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी नम्नि तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्याचे पूजन पारंपरिक समारंभाने आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्याचे जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अमर पाटील, उपविभागीय अधिकारी नितीन बी पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाच्या कामाच्या अद्ययावत स्थितीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे जलसाठे यंदा पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले असून, यामुळे प्रवाही व उपसा सिंचनासाठी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी मोठी उपलब्धता निर्माण झाली आहे. खासदारांनी व आमदारांनी प्रकल्पाच्या साठ्याबाबत व द्वार परिचलन, यांत्रिकी यंत्रणा व जलविद्युत यंत्रणाबाबत कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली व यांत्रिकी व जलविद्युत विभागाच्या कामाबाबत काही अडचणी असल्यास अवगत करण्यात यावे असे प्रकल्पस्थळी सूचित केले.

सदर जलपूजन समारंभात जलस्रोतांच्या महत्त्वावर भर देण्यात आला, तसेच शेतकरी आणि परिसरातील रहिवाशांसाठी प्रकल्पाचे फायदे स्पष्ट करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे हा जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत भरला असून, याचा फायदा लोहारा, उमरगा, औसा तसेच निलंगा तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सिंचनाच्या क्षेत्राचा विस्तार होऊन शेतक-यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेली पाणीव्यवस्था सुलभ होईल, तसेच दैनंदिन पाण्याच्या गरजाही पूर्ण होतील. यावेळी कार्यकारी अभियंता अमर पाटील, उपविभागीय अधिकारी एन. बी. पाटील व शाखाधिकारी एस. बी. गंभीरे व निम्न तेरणा प्रकल्पाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. जलपूजन कार्यक्रम यशस्वीतेसाठी माकणी येथील सरपंच तसेच उद्योजक शुभम साठे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news