23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा 

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ७ जून रोजी सकाळी लातूर शहरातील दयानंद कॉलेज समोरील ईदगाह येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार देशमुख यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत, त्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. या सणामुळे समाजात सलोखा आणि भाईचारा वाढीस लागो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, युनूस मोमीन, आयुब मणियार, प्रा. प्रवीण कांबळे, विष्णुदास धायगुडे, अ‍ॅड. विजय गायकवाड,  अ‍ॅड. प्रदीपसिंह गंगणे, मिन्हाज बागवान, मिलिंद घनगावे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR