Homeलातूरमाजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर तालुक्यातील टाकळगाव येथे रविवार, २९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात नामवंत डॉक्टरांचा चमू रुग्णांची तपासणी करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने: गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे डॉ. रमेश भराटे, धन्वंतरी हॉस्पिटल डॉ. मनोज भडके, डॉ. पल्लवी भडके, जाधव हॉस्पिटल डॉ. सौरभ जाधव, डॉ. मेघा जाधव, स्वाामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालय अंबाजोगाइचे डॉ. महेश कदम, डॉ. शंकरराव धपाटे, आशा आरोग्यधाम डॉ. व्ही. व्ही. घवले, प्राथमिक आरोग्य केंद्र तांदुळजा येथील डॉ. व्यवहारे, डॉ. स्वाती डोलारे यांसह अन्य तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
टाकळगावसह तांदूळजा, सारसा, भोसा, निळकंठ, वांजरखेडा आणि परिसरातील इतर गावांमधील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन टाकळगावचे उपसरपंच निवृत्ती देवणे, शिवतेज प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कदम,व्हाईस चेअरमन धनंजय शिंदे, नितीन भिसे, संजय शिंदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त राबवण्यात येत असलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR