लातूर : प्रतिनिधी
येथील विश्वंभर पाटील लिखीत ‘शतक सुविचार’ आणि ‘सहज सूचलं म्हणून’ हे दोन ग्रंथ माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना भेट स्वरुपात विश्वंभर पाटील यांनी दिले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची विश्वंभर पाटील (औसेकर) यांनी आशियांना निवासस्थानी भेट घेऊन सदर ग्रंथ भेट दिले.
हे दोन्ही ग्रंथ तसेच लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विषयी ‘साहेब तुम्ही परत या’ ही कविता साहेबांना समर्पित करून माजी मंत्री दिलीपराव देशमुख भेट म्हणून देण्यात आली. या प्रसंगी पुस्तकाचे लेखक विश्वंभर पाटील( औसेकर), पी. सी. पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद बिडवे, सेवानिवृत्त शिक्षक शिवाप्पा कोरके, जनार्धन खांडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
















