शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतक-यांना साखर कारखान्यांच्या माध्यमातून उसाला उच्चांकी दर मिळवून देत त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान देणारे सहकारमहर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने गौरव समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोरया लॉन्स, कुमारस्वामी नगर, शिरूर अनंतपाळ येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथरसिक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाचे अध्यक्ष एल. बी. आवाळे, सचिव डॉ. बोपलकर व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
















