लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची दि. २३ एप्रिल रोजी आशियाना निवासस्थानी नूतन लातूर जिल्हा वकील मंडळाच्या संचालकांनी सदिच्छा भेट घेतली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी वकील मंडळाच्या सर्व पदाधिका-यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अँड. शिवकुमार जाधव, उपाध्यक्ष अँड. लहू चामे, सचिव अँड. गुरुप्रसाद येरटे, सहसचिव अँड. सिद्धेश्वर धायगुडे, ग्रंथालय सचिव अँड. अमित आर्वीकर, कोषाध्यक्ष अँड. नितीन राठोड, महीला उपाध्यक्ष अँड. मंजुषा शिंदे, महिला सहसचिव अँड. श्रद्धा पाटील, स्वीकृत सदस्य अँड. बालाजी शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, वृक्ष सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
















