यवतमाळ : प्रतिनिधी
उबाठा शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची यवतमाळमध्ये पहिली भव्य सभा होत आहे. या सभेदरम्यान त्यांनी जमलेल्या तमाम जनतेची माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी माझी चूक झाली म्हणून उपस्थित कार्यकर्ते आणि जनतेची माफी मागितली. यात सभेतून फुटलेल्या खासदारांवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.
काहीवेळेला माझी चूक होते. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरश: रक्ताचे पाणी करून समोर पाऊस पडत असतानाही कशाचीही तमा न बाळगता निवडून दिले. त्याबद्दल मी क्षमा मागतो. मी मतदारसंघातील जनतेची माफी मागतो.
शिवसेनाप्रमुखांचा चेहरा, माझा शब्द या भरवशावर या गद्दाराला निवडणूक दिलं होतं. त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलं. शेवटी गद्दारच गद्दारी करून गद्दारांच्या कळपात गेला. तीन-चार वर्षांपूर्वी गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे मिंदे, त्याने ४० आमदार फोडले. या विदर्भात जेव्हा बैल पोळा होता तेव्हा या बैलांवर ‘५० खोके एकदम ओके’ असे लिहिले होते.
















