लातूर : प्रतिनिधी
बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांचा दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे आणि ‘नॅचरल शुगर’चे चेअरमन बी. बी. ठोंबरे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, सौंदळाचे सरपंच शरद आरगडे, डॉ. राम बरूरे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी माधव बावगे यांच्या सामाजिक विशेषत: अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख केला. कार्यक्रमास नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष भिंगे, सचिव शाम जैन, कोषाध्यक्ष प्रा. दशरथ भिसे, उपाध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव, अजित निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव शिंदे, नरसिंग घोडके, उत्तरेश्वर बिराजदार, प्रा. अशोक नारनवरे, धर्मराज हल्लाळे, प्रा. हर्षवर्धन कोल्हापूरे, प्रा. दत्ता सोमवंशी, प्रताप माने, रमेश चिल्ले, रुक्साना मुल्ला,
अनिल दरेकर, हनुमंत मुंढे, भाऊसाहेब उमाटे, डॉ. सुशीला पिंपळे, रामराजे अत्राम, डॉ. गणेश गोमाने, डॉ. गणेश पन्हाळे, राहूल लोंंढे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

