14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeसोलापूरमाध्यमांनी तरूण लेखकांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचवायला हवे—ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर

माध्यमांनी तरूण लेखकांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचवायला हवे—ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर

सोलापूर, – तरुण लेखक आजही उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करीत आहेत. मात्र, हे साहित्य वाचकांसमोर येत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच माध्यमांनी अशा लेखकांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचवायला हवे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात खांडेकर बोलत होते. यावेळी मंचावर लोकमंगलचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख, लेखक राजू बावीस्कर, वसंत गायकवाड, सुनंदा महाजन, समीर गायकवाड, समन्वयक शोभा बोल्ली आदी उपस्थित होते.

यंदाचा ९वा लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार निर्मला पाटील यांच्या ‘आत्मकथन’, राजू बावीस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’, सुनंदा महाजन लिखित त्रैमासिकाला आणि वसंत गायकवाड यांच्या ‘गौतम बुध्द’ कादंबरीला मिळाला. प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले. तसेच ‘झांबळ’ या कथासंग्रहासाठी सोलापूरचे समीर गायकवाड यांना ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य नितीन वैद्य, प्रा. ऋचा कांबळे, शिरीष देखणे व डॉ. दत्ता घोलप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR