मारहाण अयोग्य, चौकशी करून कारवाई होणार

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.

प्रकाश आबिटकर म्हणाले की, एखाद्या डॉक्टरची किंवा अधिका-याची चूक झाली असेल तर त्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मागण्याची लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन मारहाण करणे योग्य नाही. अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक
डॉक्टरांवर वारंवार होणा-या हल्ल्यांची गंभीर दखल सरकारने घेतली असून त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. या कायद्यानुसार डॉक्टरांवर किंवा आरोग्य कर्मचा-यांवर हल्ला करणा-यांवर अधिक कठोर कलमांखाली कारवाई केली जाईल.

‘डॉक्टरांची कमतरता नाही; भरती प्रक्रिया सुरू’
राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, आवश्यकतेनुसार आरोग्य सेवेत मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच १ जुलै रोजी १,४०० डॉक्टरांच्या भरतीची घोषणा करण्यात आली असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी असेल, ती लवकरच पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या घटनेची सविस्तर माहिती अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. मात्र, डॉक्टर किंवा परिचारिकांना मारहाण झाल्याचे समोर आले असेल, तर ते शंभर टक्के चुकीचे आहे. संबंधितांना काही तक्रार असेल, तर त्यांनी संबंधित विभाग किंवा वरिष्ठ अधिका-यांकडे दाद मागायला हवी होती, असे त्यांनी सांगितले. कदम यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणा-यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होणे ही गंभीर बाब असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असेही त्यांनी सांगितले.

‘कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार’
विधानसभेत नुकतेच पोलिसांना अधिक अधिकार देणा-या तरतुदी मंजूर झाल्याचा उल्लेख करत योगेश कदम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही स्थानिक पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अशा घटना घडत होत्या. नव्या कायद्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सेवेची भावना महत्त्वाची’
रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनीही रुग्णांशी संवेदनशीलतेने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आबिटकर म्हणाले की, रुग्णांना मदत करण्यासाठी आपण आहोत, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. सेवा देताना सहानुभूतीची भूमिका घेतली, तर नागरिकही त्याचा सकारात्मक प्रतिसाद देतील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news