मालाड येथील शाळेतील प्रार्थना कार्यक्रम प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना कार्यक्रमाबाबत प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. डॉ. भोयर यांनी सांगितले की, १० मे २०२६ रोजी मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमात एका व्यक्तीने उपस्थितांच्या डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्यासह जीवनातील दु:ख दूर करण्याबाबत दावे केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, उपस्थितांना धर्मांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आग्रह करण्यात आल्याचे आढळून आले नाही.

तथापि, चौकशीदरम्यान तक्रारदाराला घरामध्ये देवी-देवतांची छायाचित्रे लावू नयेत, असे सांगण्यात आल्याचे निष्पन्न झाले; तसेच संबंधित कार्यक्रमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार निदर्शनास आल्याने मालाड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींसह महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news