माशांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! पापलेट १७०० रुपये प्रतिकिलो, सुरमई १२०० रुपयांवर

मुंबई : प्रतिनिधी
सध्या पावसाळी मासेमारी बंदीमुळे स्थानिक बाजारात ताजा माशांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी, माशांचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील बाजारात पूर्व भारतामधील पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश येथील किनारपट्टीमधून माशांची आवक होत आहे.

वाहतूक खर्च वाढल्याने व माशांची आवक कमी झाल्याने मुंबईतील किरकोळ बाजारात सध्या पापलेट १७०० प्रतिकिलो, सुरमई मासा १२०० रुपये इतका झाला आहे.गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी २५० ते ३५० रुपये प्रतिकिलो माशांच्या दरात वाढ झाल्याचे मुंबईतील विक्रेत्याकडून सांगण्यात आले.
दरवर्षी जूनपासून महाराष्ट्रात समुद्रातील मासेमारी बंद होते.ती दोन ते तीन महिने असते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत माशांची आवक कमी होते.पूर्व किनारपट्टीवरील समुद्रातून माशांची आवक याठिकाणी होते.
मुंबईतील किरकोळ बाजारात रविवारी पापलेट सतराशे रुपये प्रतिकिलो,रावस १५०० प्रतिकिलो, सुरमई १२००, तर बोंबील ७५० रुपये प्रतिकिलो होता.स्थानिक माशासाठी ग्राहकांना गोठविलेल्या (फ्रोझन) माशांवर अवलंबून राहावे लागत आहे.

माशांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहक कमी- अधिक प्रमाणात बाजारात आहे. क्रॉफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी महाराज मच्छीमार बाजार, ग्रँड रोडवरील लोकमान्य टिळक,माहीम येथील सिटीलाईट मच्छीमार बाजार, मालाड रेल्वे स्थानक याठिकाणी मोठा बाजार आहे, तर शहर व उपनगरांत छोटे १०८ मच्छीमार बाजार आहेत.मुंबईत सुमारे ३० हजार तर मुंबई जिल्हा वगळता महाराष्ट्रात सुमारे १ लाख मच्छीमार विक्रेते आहेत.

याबाबत क्रॉफर्ड मार्केटमधील विक्रेते शेखर घाडगे म्हणाले, माशांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.त्याचबरोबर समुद्रात मासेमारी करण्यासाठी बोटीमध्ये बल्क वर्गातील डिझेल लागते.बल्क डिझेल सातत्याने वाढणा-या लिटरच्या किमतींमुळे मासेमारीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पावसाळी बंदी संपल्यानंतरही माशांचे दर पूर्वपदावर येण्याची शक्यता कमी आहे. वाहतूक खर्च वाढ व माशांचा मर्यादित पुरवठा यांसारखे घटक पुढील काळात मासेमारीच्या किमतींवर परिणाम करत राहतील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news