27.2 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeमहाराष्ट्रमाहिममध्ये भिडणार बाळासाहेबांचे शिलेदार

माहिममध्ये भिडणार बाळासाहेबांचे शिलेदार

मनसे, शिंदे गट, ठाकरे गट कोणाला मिळणार माहिम?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्वांत रंजक लढत आता माहीम विधानसभा मतदारसंघात होणार असून विरोधात लढणारे तिनही पक्षांचे उमेदवार हे मुळ बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहिममध्ये उमदेवारी जाहीर केली असून अमित ठाकरे हे बाळासाहेबांचे नातूच आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजेच मुळ बाळासाहेबांची शिवसेना. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदेंकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे. यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी माहिममध्ये बाळासाहेबांच्या शिलेदारांमध्ये तिहेरी लढाई पाहायला मिळणार आहे.

मनसेची दुसरी यादी काल जाहिर झाली. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेत. पहिल्यांदाच अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माहीम विधानसभा मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत असणार आहेत. त्यामुळे या एकुणच राजकीय परिस्थितीत माहीम विधानसभा मतदारसंघातील विजयासाठी राजकीय गणित अमित ठाकरे कशी बांधतात, हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र अमित ठाकरेंचा राजकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेऊ.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सक्रिय राजकारणाचे केंद्र कायमच राहिले. मात्र निवडणुकीच्या राजकारणापासून ते कायमच लांब राहिले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी यांनीही बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकले, मात्र ठाकरेंची दुसरी पिढीही देखील आता राजकारणात सक्रीय झाली आहे. आदित्य ठाकरें पाठोपाठ आता अमित ठाकरेही आपले नशीब आजमवू पहात आहेत.

अमित ठाकरेंसमोर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान असेल. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप न झाल्याने, या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही. वरळीतून आदित्य ठाकरे २०१९ साली लढले होते, त्यावेळेस मनसेने उमेदवार दिला नव्हता. दादर माहिममध्ये दिलेल्या उमेदवारीमुळे पंधरावर्षापूर्वी मनसेचा असलेला बालेकिल्ला पून्हा काबीज करण्याची उत्तम संधी अमित ठाकरेंमुळे मनसेला मिळतेय, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरणं आहे. याच उदाहरण द्यायचं झालंचं तर महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना शिवाजी पार्क हे मैदान सभेसाठी हवे असताना ते मिळालं नव्हतं. त्यावेळी राज ठाकरेंनी असा काही करिष्मा केला की या मतदार संघातील सहाच्या सहा नगरसेवक मनसेचे निवडून आले. आता पून्हा राज ठाकरे अमित ठाकरेंच्या विजयासाठी असाच काहीचा करिष्मा करतील अशी चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR