21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमनोरंजनमी त्याला माफ करणार नाही

मी त्याला माफ करणार नाही

गोविंदाच्या अफेअरवर पत्नीची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि सुनीता आहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. सुनीता अनेकदा तिचा पती गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. सुनीता अनेक वेळा गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही बोलली आहे. आता, तिने पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअरवर मत व्यक्त केले आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

नवीन पॉडकास्ट मिस मालिनीशी झालेल्या मुलाखतीत सुनीता तिच्या पती गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलली. सुनीता यांनी असाही दावा केला की गोविंदाने तिचा मुलगा यशला त्याच्या करिअरमध्ये मदत केली नाही आणि त्याच्या वडिलांच्या जबाबदा-या पार पाडल्या नाहीत. पॉडकास्टचा फक्त प्रोमो व्हीडीओ रिलीज झाला असला तरी, प्रोमोमध्ये सुनीता यांनी तिच्या पतीबद्दल केलेल्या स्पष्ट खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे.

सुनीता म्हणते, मी गोविंदाला माफ करणार नाही. मी नेपाळची आहे. जर मी माझी खुकरी काढली तर सगळे अडचणीत येतील. म्हणूनच मी म्हणतेय, आताच सावध हो बेटा. गोविंदाच्या अफेअरकडे इशारा करताना सुनीता पुढे म्हणाली, अशा मुली खूप येतात. पण तू थोडा मूर्ख आहेस. तू ६३ वर्षांचा आहेस. तू टीनाचं लग्न कर. यशचे करिअर धोक्यात आहे ते ठीक करायला त्याला मदत कर. कसा बाप आहेस तू.
सुनीताच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर, हिरो नंबर १ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जोडप्याचे दीर्घकाळचे नाते आता त्यांच्या घराबाहेर पडून लोकांच्या नजरेत आले आहे. गोविंदाच्या विवाहबा संबंधांच्या अफवाही पुन्हा उठल्या आहेत. गोविंदा त्याच्या पत्नीच्या दाव्यांवर कशी प्रतिक्रिया देईल हे पाहणे बाकी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR