26 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रमुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवारांचे लोकेशन काढा

मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवारांचे लोकेशन काढा

मुंबई : प्रतिनिधी
पार्थ पवार यांच्यावर आरोप करताना अंजली दमानिया म्हणाल्या की, पार्थ पवारांचा कॉल डेटा रेकॉर्ड तत्काळ मागवावा. त्यामधील कोडवरून आणि टॉवर लोकेशनवरून घटनेच्या वेळी ते अडीच किलोमीटरच्या परिघात कुठे होते? याचा उलगडा होईल. तसेच, पोलिस ठाण्यात आणि गार्डनमध्ये घुसणारी माणसे कोण होती? हेदेखील तपासात निष्पन्न होईल.’असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अशामध्ये बुधवारी (१९ नोव्हेंबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पार्थ पवारांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही, या प्रकरणात अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. तसेच त्यांनी यावेळी आरोपी सूर्यकांत येवलेला मिळालेल्या जामिनावर संशय व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘जर येवलेला कोठडीत ठेवून त्याचा जबाब नोंदवला असता, तर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव उघड झाले असते. हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेला जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी आता तातडीने न्यायालयात जाऊन येवलेचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्याला अटक करून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव वदवून घ्यावे. असे आव्हान त्यांनी यावेळी पोलिसांना दिले आहे. तसेच, १६ तारखेला बॉटेनिकल गार्डन्सकडून पत्र लिहिले की इथे काही माणसे आली. आम्हाला सांगितले ही जागा आमची आहे, रिकामी करा. ही माणसे पोलिस ठाण्यात गेली. त्यांनी सांगितले तुम्ही पोलिस पाठवा. त्यानंतर तिथे गेल्यावर त्यांना माहिती मिळाली की कुठलीही कागदपत्रे नव्हती, तरीही अमेडियाच्या माणसांनी दादागिरी केली. बाऊन्सरही घेऊन गेले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने जो व्यवहार केला त्यात फक्त कागदपत्रेच नाही तर पोलिसांवर दबाव आणला. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. कोणताही साधा व्यवहार नाही. राजकीय प्रभाव होता, बळाचा वापर झाला होता. या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवारांनी आता तरी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR