मुंबईतील ६० पर्यटक चिखल, मातीत दबले!

मुंबईतील चितळे डॉक्टरांसह इतरांचा संपर्क होईना
मुंबई : प्रतिनिधी
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले मुंबईचे डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांचा मुंबईतील ६० जणांचा ग्रूप नेपाळ आणि चीन बॉर्डरवरच्या इमिग्रेशन बिल्डिंगच्या ढिगा-याखाली अडकल्याची माहिती रिचा ट्रॅव्हल्सने दिली. आता या पर्यटकांचा चिखल, मातीच्या ढिगा-याखाली फसून मृत्यू झाल्याची शंका नेपाळ सरकारला आहे. हे पर्यटक ४० ते ५० फूट खाली दबले गेले असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे या पर्यटकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबईतल्या अंधेरी परिसरातून डॉक्टर मिलिंद चितळे यांची टूर कंपनी ही लँड ट्रेल्सच्या माध्यमातून दि. २२ ऑगस्टला अंधेरी, विलेपार्ले, ठाणे, कोल्हापूर, पुणे, नागपूर परिसरातून ६० पर्यटक कैलास मानसरोवरला गेले होते. २३ तारखेला तिथे पोहोचल्यावर २ दिवस त्यांना बेसिक ट्रेकिंगसाठी ठेवले होते. २५ तारखेला रात्री ते बॉर्डरजवळ पोहोचले आणि २६ तारखेला सकाळी हे सर्व पर्यटक नेपाळ आणि चीन बॉर्डरवरील इमिग्रेशन बिल्डिंगमधून कैलास मानसरोवरसाठी चीनमध्ये प्रवेश करणार होते. त्याचदरम्यान, महाप्रलय आला आणि इमिग्रेशन इमारतीत मातीच्या ढिगा-याखाली हा ग्रुप दबला गेला. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागणे कठीण आहे.

नेपाळ सरकारनेही या पर्यटकांच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून, बचाव पथक सध्या घटनास्थळी पोहोचू शकत नाही. नेपाळ-चीन सीमेजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, माती आणि दगडांचा खच आहे. सध्या इमारतीवरील मातीचा ढिगारा हलविता येत नाही. पर्यटक याच ढिगा-याखाली दबले गेल्याची भीती नेपाळ सरकारने व्यक्त केली. नेपाळ आर्मीसोबत नेपाळ पोलिस आणि वेगवेगळ््या यंत्रणा या पर्यटकांचा शोध घेत आहेत.

६ महिने प्रतीक्षा
करण्यास सांगितले!
नेपाळ सरकारने या पर्यटकांच्या कुटुंबियांना १८४ दिवस म्हणजेच सहा महिने थांबण्याची सूचना केली. त्याअगोदर भारतामध्ये लोकल पोलिस स्टेशनमध्ये पर्यटक हरवल्याच्या तक्रारी नोंदवायच्या सूचना नेपाळ सरकारने भारतीय दुतावासाला केल्या. त्यामुळे चिंता वाढली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news