19.7 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत इमारतीला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबईत इमारतीला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील ‘रिया पॅलेस’ या इमारतीमधील दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या आगीत दुर्दैवाने तिघांचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात ‘रिया पॅलेस’ ही १४ मजल्यांची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी आठ वाजता आग लागली. दहाव्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. या आगीत घरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा आणि एका कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे.

चंद्रप्रकाश सोनी (वय वर्षे ७४), कांता सोनी (वय वर्षे ७४) आणि पेलू बेटा (वय वर्षे ४२) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. आगीत होरपळल्यामुळे या तिघांना अग्निशमन जवानांनी सुरुवातीला कुपर रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंधेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR