मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढील काही तास अतिमुळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
लोकलची वाहतूक मंदावली आहे. पुढील काही तास अति धोक्याची असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने अगोदर ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, आता मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सत्रात सुटी जाहीर केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. यासोबतच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
















