मुंबईत वाहतूकीची कोंडी

मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मात्र, आंदोलक हे महापालिकेच्या समोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून बसले असून त्यांनी भर रस्त्यावर गाड्या लावल्या आहेत. यामुळे मुंबईमध्ये वाहतूकीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला.

राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळताना दिसत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मात्र, मुंबई पालिकेच्या समोरील मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्येही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमजले आहेत. शिवाय मुंबईतील मुख्य रस्त्यांवर त्यांनी वाहने लावल्याने वाहतूकीचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर कबड्डी, खो खो आंदोलकांकडून खेळली जात आहेत.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहतूकीत मोठे बदल केले आहेत. आता नुकताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान मराठा आरक्षणाबद्दल केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केली जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरीच मोर्चे काढली आहेत. त्याची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवणे किंवा रिर्झेव बॅेंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाही, असे केल्याने प्रश्न सुटणार नाही.

आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईवर परिणाम
आज जरांगे पाटील हे स्वत: आझाद मैदानावर बसलेले आहेत. तर सर्व मराठा बांधवांनी देखील आझाद मैदानावरच गेले पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता? त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आहेत. आपलीही बदनामी नको. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईमध्ये थोडा परिणाम होईल, पण मला वाटत नाही की, यावर टीका करण्याचे काही कारण आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news