20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा

मुंबई : आज मंगळवारी (दि. २६ नोव्हेंबर) राज्य विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा आणि ओघानेच सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार पाहण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपुर्द केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, राजभवनावरील ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार असल्याचे समजते.

शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री
दरम्यान, भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी बोलताना म्हटले होते की, आज विधानसभेची मुदत संपत आहे. त्यांनी (मुख्यमंत्री शिंदे) आज राजीनामा दिल्यास, त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्याची विनंती केली जाईल. तिन्ही पक्षाचे नेते, आमचे संसदीय मंडळ मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील.

सत्तेचा फॉर्म्युला आज ठरणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी मुंबईत येत असून, तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर आज सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते. अमित शहा, राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR