22.2 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले आहे. शिंदे हे भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका शिंदेंच्या दौ-याला बसला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने शिंदे कुटुंबिय श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र भीमाशंकर इथे खराब हवामान आहे. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR