मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कार्यक्रमस्थळी गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडत आहे. मुख्य शासकीय सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानात सुरू होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी सभास्थळी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे सांगत या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच या कार्यक्रमात उपस्थित असलेले काही ओबीसी आंदोलक अचानक उठले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभास्थळी गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिस कर्मचा-यांनी घोषणाबाजी करणा-या ओबीसी आंदोलकांना बाजूला नेत ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून गोंधळ सुरू असताना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, वनमंत्री गणेश नाईक आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या वेळी सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले आहेत. ओबीसी समाजासाठी प्रलंबित असलेला २,९३३ कोटी रुपयांचा निधी १५ दिवसांत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news