27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरमुख्याध्यापिका सईदा शेख शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित 

मुख्याध्यापिका सईदा शेख शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील मिसबाहुल उलूम उर्दु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सईदाबेगम गुलाम महेबुब शेख यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना परभणी येथील हजरत सय्यद  शाह तुराबूल हक (रहे.) उर्सनिमित्त सहारा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पवन निकम होते. प्रमुख पाहूणे म्हणुन वसीम बु-हाण, अनिल मोरे, सुरेश हिवराळे, प्रा. अरुण पडघन, अजमत खान यांची उपस्थिती होती. मिसबाहुल उलूम उर्दु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सईदाबेगम गुलाम महेबुब शेख यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत शिक्षणाचा जागर केला. त्यांनी असंख्य शाळाबा  मुला, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR