मुरूड : वार्ताहर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांनी लातूर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. मुरुड काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
मुरूड येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत रवींद्र चव्हाण यांच्या बद्दल आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. लोकनेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील जनतेच्या मनात कायम घर करून राहिलेले लोकनेते असून त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. विलासराव देशमुख यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून त्यांचे स्मरण जनतेच्या मनातून कधीही पुसले जाऊ शकत नाही.
भाजप नेत्यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे मत यावेळी पदाधिका-यांनी व्यक्त केले. या आंदोलनात लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे, रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा लातूर जिल्हा काँग्रेस विधी विभागाचे अध्यक्ष अॅड.प्रवीण पाटील, लातूर तालुका किसान सेलचे अध्यक्ष रामानंद जाधव, काँग्रेस चे मुरुड शहराध्यक्ष दिपक पठाडे, राजेंद्र मस्के, जगन चव्हाण, निलेश फेरे, संजय अंधारे, भालचंद्र धावारे, प्रभू देवकर, अमोल गाडे, मुरुड युवक शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश सव्वाशे, नरसिंग पुदाले, प्रशांत पिंपरे, शरीफ सय्यद, विवेक सुरवसे, चैतन्य पठाडे, श्यामराव ईटकर, रवी अंधारे, समाधान गायकवाड, अविनाश शिंदे, मंगेश देशमुख, दत्ता सवई, शब्बीर सय्यद, शिवलिंग चौधरी, आबा पाटोळे, पिराजी इटकर, बळी घुटे, पवन पठाडे, वैजनाथ जाधव, वसंत शिंदे, मोहसीन मणियार यांच्यासह मुरुड शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

