लातूर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील बनशेळकी रोड परिसरातील राणीमहल शेजारील क्रांतीनगरात दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घराच्या वाटणीच्या मागणीच्या कारणावरून लहान मुलाने आई मोठ्या भावावर कोयत्याने वार केले होते. या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या आई व भावावर लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. दरम्यान रविवारी सकाळी गंभीर जखमी आईचा उपचारा दरम्यान मृत्खू झाल्याची घटना घडली आहे.
दि. २० मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उदगीर शहरातील बनशेळकी रोड परिसरातील राणीमहल शेजारील क्रांतीनगरात राहणा-या संगिता बासाहेब बनशेळकीकर यांचा लहान मुलगा सिध्दार्थ बाबासाहेब बननशेळकीकर याने घराच्या वाटणीच्या मागणीच्या वादातून त्याच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार केले होते. त्याला आडवण्यासाठी गेलेल्या मोठा भाऊ सचिन बाबासाहेब बनशेळकीकर याच्या हातावर ही कोयत्याने वार केल्याने मुलगा व आई गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविषालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान याप्रकरणी महादेवी सचिन बनशेळकीकर यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीसांनी कोयत्याने वार करणा-या सिध्दार्थ बनशेळकीकर याचे विरोधात गु.र.न.२८१/२०्र२४ कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करून त्याने गुन्ह्यात वापरलेला कोयता ही जप्त केला होता. तर इकडे रविवारी उपचारा दरम्यान आई संगिता बाबासाहेब बनशेळकीकर यांचे रविवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्खूची खबर मिळताच उदगीर ग्रामीण पोलीसांनी लातुरात दाखल झाले. त्यानी पंचानामा करून प्रेताचे शवविच्छेदन करून प्रेत नातलगाच्या ताब्यात देऊन सदरील गुन्ह्यात खुनाचे कलमाची वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले.