27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeक्रीडामुलींच्या संघाने पटकावले विभागीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

मुलींच्या संघाने पटकावले विभागीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

लातूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या अधिपत्याखाली विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसी, लातूरतर्फे मुला-मुलींच्या इंटर कॉलेजिएट कबड्डी स्पर्धा विलासराव देशमुख फाउंडेशन स्पोर्ट्स ग्राउंड, न्यू. एमआयडीसी, एअरपोर्ट रोड, लातूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी शेळवे ता. पंढरपूर मुलींच्या संघाने विभागीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी सोलापूर, नांदेड, धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यातून १८ ते २२ वयोगटातील मुलींचे ११ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेची सुरूवात प्राचार्य डॉ. बी. एस. वाकुरे यांच्या हस्ते नाणे फेक करून झाली. मुलींच्या ११ संघामध्ये जोरदार कबड्डी खेळाचे प्रदर्शन पाहयला मिळाले.  या स्पर्धेत कर्मयोगी इस्टटयूट ऑफ टेक्नालॉजी शेळवे ता. पंढरपूर मुलींच्या संघाने विभागीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. श्री तुळजा भवानी कॉलेज ऑफ इंजिनिरींग तुळजापूरचा मुलींचा संघ उपविजेता ठरला. तर एम. जी. एम. कॉलेज नांदेडचा संघ तृतीय राहिला.  सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाचे सहासपूर्ण प्रदर्शन घडवत संघीक एकता पहायला मिळाली. या स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच लक्ष्मण बेल्लाळे व त्यांच्या टिमने काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR