मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन

ठाणे : प्रतिनिधी

पालघरमधील शेतक-याने न्याय मिळवण्यासाठी अनोखं आंदोलन केल्याची घटना घडली आहे. मोखाडा तालुक्यातील शेतक-याची म्हैस मृत झाल्यानंतर बँकेने विम्याची नुकसान भरपाई थकवली. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी शेतक-याने मृत म्हशीला बँकेसमोर आणत आंदोलन केले आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोडव्यवसाय म्हणून सन २०२२ मध्ये बँक ऑफ बडोदा या मोखाडा शाखेतून जवळपास बारा लाखांचे कर्ज घेतले. या कर्जातून दहा दूधाळ म्हशी खरेदी केल्या तसेच चोला मंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या म्हशींना भविष्यात काही समस्या उद्भवल्यास बँकेकडून विमा कवच सुद्धा घेतले होते. मात्र म्हैस खरेदी केल्यानंतर वर्ष-दोन वर्षांत त्यांच्या तबेल्यातील दोन म्हशी मेल्या.

यातली पहिली म्हैस २०२३ मध्ये मेली आणि दुसरी म्हैस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्युमुखी पडली आहे. मात्र विमा काढलेला असतानाही मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेच्या आडमुठ्या कर्मचा-यांमुळे दोन वर्षांपूर्वीचे नुकसान भरपाईचे पैसे नवसु दिघा यांना मिळालेले नाहीत. आता मेलेल्या म्हशीचे पण पैसे मिळणार नाहीत म्हणून दिघा यांनी आपली मेलेली म्हैस ट्रॅक्टरमध्ये आणून बँकेच्या समोर आणून ठेवली. एकतर मला इन्शुरन्सचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे काहीकाळ बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथे पोलिस प्रशासनही तैनात होते.

मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचा-यांकडून नेहमी ग्राहकांची फसवणूक केली जाते असा आरोप सुध्दा यावेळी शेतक-यांनी केला. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी घोसाळी गावातील शेतकरी मधू माळी,गुंबाडपाडा गावातील शेतकरी आंबेकर यांनी देखील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्ज घेऊन म्हशी खरेदी केल्या होत्या.

त्यांच्या म्हशी मटन दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे, तरी सुद्धा त्यांना ही विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. बँकेच्या या ढोबळ कारभारामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालक शेतक-यांनी त्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचा-यांकडून अशीच जबरदस्ती चालू राहिली तर आत्महत्या करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा बँकेला दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news