Homeसोलापूरमोटयाळच्या दावल मलिक यात्रेनिमित्त बिहारच्या शाहरुख साबरीचा कव्वाली कार्यक्रम

मोटयाळच्या दावल मलिक यात्रेनिमित्त बिहारच्या शाहरुख साबरीचा कव्वाली कार्यक्रम

अक्कलकोट ;
अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील हजरत पिर दावल मलिक यात्रेस दि ४ जानेवारी पासून प्रारंभ होत आहे. येत्या दि ४ जानेवारी ते ६ जानेवारी पर्यंत ही यात्रा होणार असून आसिया पोल्ट्री फार्मचे मालक महिबूब उंबर मुल्ला यांच्या वतीने दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता हजरत पिर दावल मलिक यात्रा निमित्ताने मोट्याळ येथे बिहार चे सुप्रसिद्ध कव्वाली गायक शाहरुख साबरी यांचा काव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कव्वालीचे कार्यक्रम महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच होत असून ते अतिशय उत्कृष्ट व प्रसिद्ध बिहारचे कव्वाली गायक आहेत. औरंगाबाद येथील प्रसिद्ध कव्वाली गायिका इरम चिस्ती यांच्या सोबत जुगलबंदी होणार असून या दोघात सामना रंगणार आहे.

सालाबादा प्रमाणे याहीवर्षी अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील हजरत पिर दाऊल मलिक यात्रेस गुरुवार पासून प्रारंभ होत असून दि .४ वार गुरुवार दिवसी गावातील हजरत पीर दाऊल मलिक देवाचा गंध ढोल ताशा वाजा गाजत गावातून निघते गंध चडवण्याचा कार्यक्रम होतो दि .५ शुक्रवार रोजी देवाला नैवद व सायंकाळी ४ वाजता देवाचा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता कव्वाली चा महा मुकाबला कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .

दि. ६ रोजी देवाची जियारत होणार असून आशा प्रकारे कार्यक्रम असून हरजत पिर दाऊल मलिक यात्रा ही गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र मिळूल मिसळून साजरा करतात या यात्रेस बाहेरून गावातून येणाऱ्या भक्तासाठी स्वागत सर्व यात्रेतील सर्व कार्यक्रम चा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे अशी माहिती हरजत पिर दाऊल मलिक उरूस कमिटी व ग्रामस्त मंडळ मोट्याळ यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR