22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeराष्ट्रीयमोफत आधारकार्ड अपडेटला मुदतवाढ

मोफत आधारकार्ड अपडेटला मुदतवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली. आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. नव्याने देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. आधार कार्ड जारी करणा-या यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात माहिती दिली.

मुदतवाढ मिळाल्याने आधार कार्डधारक आता १४ जून २०२६ पर्यंत कागदपत्रांच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करु शकतात. ही मुदत यापूर्वी १४ जून २०२५ पर्यंत होती. आधार कार्डमध्ये कागदपत्र अपडेट करण्यासाठी यूआयडीएआयकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मोफत आधार कार्ड अपडेटची सुविधा माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे ऑनलाईन पोर्टलद्वारे डेमोग्राफिक इन्फॉर्मेशनला अपडेट करता येऊ शकते. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पत्ता पुरावा, ओळखीचा पुरावा या संदर्भातील कागदपत्रे अपलोड करता येतील. एखाद्या आधार कार्डधारकाला बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर त्यासाठी शुल्क द्यावे लागेल. यासाठी त्याला जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR