लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २८ हजार ५२१ जागेवर प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू आहे. पालकांना ३० एप्रिल पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र पालकांचा मोफत प्रवेश प्रक्रीयेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने दि. १० मे पर्यंत आनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
आरटीई अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा करीता वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणीक द्ष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. १६ एप्रिल पासून लिंक देण्यात आली होती. सदर अर्ज दि. ३० एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार होते. मात्र यावर्षी पालकांनी मोफत प्रवेश प्रक्रीयेला पालकांनी अल्प प्रतिसाद दिल्याने दि. १० मे पर्यंत शिक्षण विभागाने अर्ज करण्यासाठी पालकांना आणखी एक संधी दिली आहे.
आरटीई अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा करीता वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणीक द्ष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन अर्ज भरताना पालकांनी अवैध निवासाचा पत्ता, जन्मतारखेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अशी चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास येताच सदरील प्रवेश रद्द होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निवास स्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानीक स्वराज्य संस्थेच्या शाळा, स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळेत वंचित, दुर्बल व सामाजिक, शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना प्राधान्यक्रम असणार आहे.