मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांचा आकडा ९ वर; ढिगा-याखालून आणखी एकाचा मृतदेह सापडला

पिंपरी-चिंचवड : येथील मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ पोहोचली आहे. मदत आणि बचाव कार्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी (११ जुलै) ढिगा-याखालून ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर रात्री उशिरा आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

त्यामुळे या दुर्घटनेतील मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरारात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शोधपथकाला आणखी एक व्यक्ती आढळून आली. ती व्यक्ती वामन कसबे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, ही घटना ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. मोशी कचरा डेपोमधील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (कच-यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कच-याचा एक प्रचंड ढिगारा कोसळला होता. त्यावेळी इमारतीमध्ये २२ कर्मचारी कार्यरत होते, तर इमारतीलगत कच-याच्या ढिगाजवळ एक व्यक्ती उपस्थित होती. अशा स्थितीत एकूण २३ जण ढिगा-याखाली अडकले होते. घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल , अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम राबविण्यात आली.

दुर्घटनेनंतर ५ जणांना स्वत:हून बाहेर पडण्यात यश आलं होतं. त्यानंतर भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक आणि पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी ढिगा-याखालून ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news