26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeअंतरराष्ट्रीयम्यानमारमधील सायबर फ्रॉडचे अड्डे उद्ध्वस्त

म्यानमारमधील सायबर फ्रॉडचे अड्डे उद्ध्वस्त

म्यावदी : वृत्तसंस्था
चीन, म्यानमार आणि थायलंडच्या एजन्सीने सायबर फ्रॉडविरोधात संयुक्त कारवाई केली. म्यानमारच्या म्यावदी परिसरात जुगार आणि ऑनलाइन फसवणूक करणा-यांचा अड्डा होता. याविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी ४९४ इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तर याताई न्यू सिटीमधील फसवणूक करणारा परिसर पूर्णपणे साफ करण्यात आला.

म्यानमारचा हा परिसर जुगारी आणि ऑनलाइन फ्रॉडचा अड्डा बनला होता. त्या ठिकाणाहून चीन, म्यानमार, थायलंडचे गुन्हेगार लोकांची फसवणूक करायचे. त्याबाबत या तिन्ही देशांना अनेक महिन्यांपासून तक्रारी मिळत होत्या. त्यानंतर या तिन्ही देशांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.

या ऑपरेशनमधून ९५२ संशयित चिनी नागरिकांचे प्रत्यार्पण करून त्यांना चीनला परत पाठवण्यात आले आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाकडून अधिकृतपणे ही आकडेवारी देण्यात आली. या ऑपरेशनसाठी चीनच्या पब्लिक सिक्युरिटी विभागाने एक टास्क फोर्स पाठवला होता. चीन, म्यानमार आणि थायलंडने टेलिकॉम आणि ऑनलाइन फसवणुकीचा सामना करण्यासाठी मंत्रिस्तरीय समन्वय समिती बनवली होती. ज्यातून ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR