लातूर : प्रतिनिधी
राज्यात नावलौकिक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गाळप हंगामासाठी मिल रोलरचे पूजन राज्याचे माजी मंत्री तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ५ जून रोजी करÞण्यात आले. त्यानंतर संचालक मंडळाची चालू गळीत हंगाम आढावा बैठक झाली. तसेच पर्यावरण दिनानिमित्त कारखाना परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या गळीत हंगामात ९ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी केली जात असून मांजरा कारखान्याने आजपर्यतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. त्यानुसार येणारा गळीत हंगाम देखील यशस्वी करून ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप केला जावा यासाठी यंत्रणा सज्ज होत असुन येणा-या गाळप हंगामामध्ये कारखान्याने ९ लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून गाळपास येणा-या उसाची तोड १०० टक्के हार्वेस्टरद्वारे करण्यात येणार आह. कारखाना मालकीचे सध्या ८ हार्वेस्टर उपलब्ध असून येणा-या हंगामासाठी आणखीन कारखाना मालकीचे १७ हार्वेस्टर घेण्याचा निर्णय मांजरा साखर कारखान्याने घेतला असुन १०० टथके हार्वेस्टरद्वारे ऊसतोड करणार आह. कारखाना मालकीचे एकूण २५ हार्वेस्टर व कारखाना हमीवर लातूर जिल्हा बँकेमार्फत दिलेले ४३ हार्वेस्टर व इतर हार्वेस्टर असे एकूण ८० हार्वेस्टरद्वारे ऊसतोड करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली
दि. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन असल्याने त्यानिमित्ताने कारखाना परिसरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व संचालक मंडळाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून प्रत्येकानी आपापल्या परीने वृक्षाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, असे मनोगत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकराव काळे, कारखान्याचे संचालक श्रीशैल उटगे, मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उफाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरु कदम, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, बालाजी पांढरे, अनिल दरकसे, विलास चामले, अरुण कापरे, कार्यकारी संचालक पंडीत देसाई, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, विकास देशमुख, कारखान्याचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी कामगार आदींची उपस्थिती होती.