17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रयापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही

यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही

जळगाव : प्रतिनिधी
यापुढे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्षे आपल्यासोबत आहे. अनेक वर्षे आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिलेत. कोणतीही जात-धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडली आहे, पुढील निवडणुकीत कदाचित मी असेन किंवा नसेनही. असे म्हणत माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी आज मोठी घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांची भाषणंही आज ऐकायला मिळणार आहेत. सध्या माझी तब्येत ठीक नसते, त्यामुळे पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे तो ईश्वरच आता ठरवेल.

पुढील निवडणुकीत कदाचित मी असेन किंवा नसेनही. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसे मला सहकार्य केले, तसे रोहिणीताईंना करावे आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे ही विनंती, असे म्हणत एकनाथ खडसेंनी रोहिणी खडसेंना निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR