युद्धाच्या भीतीने पाक लष्करात दुफळी; लष्करप्रमुख गायब

 

नवी दिल्ली, इस्लामाबाद : वृत्तसंस्था
काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा भारत भयंकर सूड घेणार या भीतीपोटीच पाकिस्तानची गाळण उडाली आहे. पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानी लष्करात दुफळी माजली असून २५० लष्करी अधिका-­यांसह ४५०० सैनिकांनी राजीनामे दिले असल्याचे वृत्त आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर गायब झाले आहेत. अनेक लष्करी अधिका-­यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारकडे रेटा लावला असल्याचे कळते.

पाकिस्तानी सैन्य दलात सध्या दोन गट पडले आहेत. जनरल मुनीर यांनी स्वत:च्या फायद्याकरिता सैन्य दलाचा वापर केल्याचा आरोप एका गटाकडून होत आहे. वरिष्ठ लष्करी अधिका-यांच्या एका गटाने पत्र लिहून मुनीर यांच्यावर अनेक आक्षेप घेतले आहेत. मुनीर यांच्यामुळे पाकची अवस्था सध्या १९७१ सारखी झाली आहे. ते पदावर कायम राहिले तर १९७१ ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे १९७१ च्या युद्धात भारताने पाकचे दोन तुकडे करून बांगला देशची निर्मिती केली होती.

मुनीर यांचा होणार मुशर्रफ : याह्या खान?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेली भूमिका बघता असीम मुनीर यांची अवस्थाही तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि याह्या खान यांच्यासारखीच होणार, अशीही चर्चा आहे. अयुब खान यांना पदच्युत करून याह्या खान यांनी सत्ता हाती घेतली. देशात मार्शल लॉ लागू केला. पण १९७१ मध्ये भारताकडून दारुण पराभव आणि पाकचे दोन तुकडे झाल्यानंतर याह्या खान यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही नवाज शरीफ यांची सत्ता उलथवत सूत्रे आपल्या हाती घेतली. पण नंतर त्यांना पाकमधून परागंदा व्हावे लागले. आता मुनीर यांचीही अशीच अवस्था होणार, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, सुमारे ४,५०० सैनिक आणि २५० अधिका-यांनी राजीनामे दिले असून अनेक राजकीय नेते, उद्योगपती, सैन्य अधिका-­यांनी आपल्या कुटुंबीयांना आश्रयासाठी परदेशात पाठवल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news