नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष २०२५ च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषिकेश आलासे ६१, आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोपडा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७, वा तर दीक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे.
हृषिकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७),
श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्ज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजूरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१).
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर २०२५ – फेब्रुवारी २०२६ दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ९५८ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवांतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून -३१७, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) १०४, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – ३०६, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १५८, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- ७३ उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने २५८ उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- १२९, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- २६, इतर मागास वर्ग -८६, अनुसूचित जाती- ०८, अनुसूचित जमाती – ०६ उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण तीन दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

