22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeराष्ट्रीययोगाने जगाला जोडून ठेवले, जीवनाला दिशा दिली

योगाने जगाला जोडून ठेवले, जीवनाला दिशा दिली

पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणम्मध्ये ‘योगाभ्यास’

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो जणांसोबत विशाखापट्टणम येथे योग दिवस २०२५ साजरा केला. यावेळी त्यांनी, योग हा सर्वांसाठी आहे, सीमा, वय किंवा क्षमतेपलीकडे योग आहे. योगामुळे जीवनाला दिशा मिळते, योगाने जगाला जोडून ठेवले आहे, असे स्पष्ट केले.

यावेळी त्यांच्यासोबत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विशाखापट्टणम् येथे जागतिक योग दिवस २०२५ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मान्यवर देखील योग दिन साजरा करत आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा योग दिन मानवतेची सुरुवात ठरो, त्यामुळे आंतरिक शांती हीच जागतिक धोरण बनते. योग हा जीवनाला दिशा देतो. योगानेच जगाला जोडून ठेवले आहे. सीमा, वय आणि क्षमतेपलिकडे योग हा सर्वांसाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR